पुणे : पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख चारशे रुपयांचे दोन पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने शिंदे पूल चौकात केली. बालाजी लक्ष्मण शिरमेवाड (वय-३९ रा. शिंदे पुल, शिवणे), प्रतिक शामराव साठे (वय-२२ रा. चंद्राई बिल्डींग, पिंपळे निलख) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1c87c71-b5c2-11e8-baf4-33156f5e5b3e’]

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव यांना एक इसम शिंदे पूल चौकातील सार्वजनीक रोडवर उभा असून त्याच्या जवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या महितीच्या आधारे पथकाने शिंदे चौकात सापळा रचून बालाजी शिरमेवाडला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडले.

पुणे : आजारी पत्नीचा पतीने केला खून, पतीला अटक 

बालाजी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र प्रतिक साठे याचेकडे देखील एक पिस्टल आणि काडतुस असल्याची माहिती दिली. पोलिसांनी साठे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही एक पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखा युनिट – १ ने केलेल्या कारवाईत एकूण एक लाख चारशे रुपयांचे दोन पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dee829e7-b5c2-11e8-8ec2-cd216cd20b8b’]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुभाष पिंगळे, सुधाकर माने, उमेश काटे, तुषार खडके, पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.