ट्रक चालकांना लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : पोलिस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील अंकली फाटा, धामणी रस्ता, सांगली-मिरज रस्ता, मिरजेतील वंटमुरे कॉर्नर परिसरात ट्रकचालकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकली येथे पाठलाग करून संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली रोकड, मोबाईल, कोयते असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाहरूख नदाफ (वय 19, त्रिमूर्ती कॉलनी), सोहेल उर्फ टोल्या तांबोळी (वय 20, हनुमाननगर), नागेश जगदाळे (वय 20, त्रिमूर्ती कॉलनी), राजा उर्फ राजु कोळी (वय 19, हरिपूर रस्ता, सर्व सांगली), संतोष उर्फ हृतीक चक्रनारायण (वय 19, माणिक पेठ, अक्कलकोट, सोलापूर), अजय उर्फ वासुदेव सोनवणे (वय 20, विठ्ठलनगर शंभरफुटी रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

दोन दिवसांपूर्वी या टोळीने अंकली फाट्याजवळ मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून ट्रक चालकांना लुटले होते. पाच ट्रक चालकांना मारहाण करत त्यांच्याकडून रोकड, मोबाईल असा पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर फळमार्केट परिसरातही या टोळीने असेच गुन्हे केले होते. मिरजेतील वंटमुरे कॉर्नर परिसरातही जबरी चोरी केली होती. याप्रकरणी सांगली ग्रामीण, सांगली शहर आणि मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सराईत गुन्हेगारींची टोळी यात कार्यरत असल्याचे प्राथमिक तपास समोर आले. त्यानुसार तातडीने तपास करून शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. अंकली येथील रेल्वेच्या जुन्या बंद केलेल्या गेट शेजारी शेतात काही तरूण असल्याची माहिती पथकास मिळाली. पोलिस आल्याचे पाहिल्यानंतर ते तरुण पळू लागले. पथकाने थरारक पाठलाग करत सहा जणांना पकडले. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी सात ठिकाणी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन कोयता, एक लोखंडी सळी, 34 हजार 700 रूपये रोख, 93 हजारांचे मोबाईल असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपाधीक्षक अशोक वीरकर अधिक तपास करत आहेत
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, जितू जाधव, वैभव पाटील, साईनाथ ठाकूर, सागर लवटे, सायबर शाखेतील संदीप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चार संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार
यातील संशयित शाहरूख नदाफ याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, मारमारी, आर्म ऍक्‍ट सारखे सहा गुन्हे दाखल आहेत. राजा कोळी याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारीसह 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोहेल तांबोळी याच्यावर चोरी, खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत. तर अजय सोनवणे याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

You might also like