NASA पुन्हा एकदा माणसाला ‘चंद्रा’वर पाठवणार, ‘या’ 3 कंपन्या बनवतील ‘स्पेस क्राफ्ट’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने (NASA) आपल्या चंद्र अभियानासाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या चंद्रावर अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी अंतराळ यान बनवतील. नासा 2024 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर एका स्त्रीला आणि पुरुषाला उतरवणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी, नासाने लँडिंग सिस्टम तयार करण्यासाठी अमेरिकेच्या तीन अंतराळ कंपन्यांची निवड केली आहे.

स्पेस एक्स (Space X), ब्लू ओरिजिन (Blue Origin) आणि डायनेटीक्स (Dynetics) असे या तीन कंपन्यांची नावे आहेत. त्यापैकी स्पेस एक्सचे मालक अब्जाधीश एलोन मस्क आणि ब्लू ओरिजिनचे मालक जेफ बेझोस आहेत. या तिन्ही कंपन्या नासासोबत स्वत:च्या लँडिंग सिस्टमला डिझाईन आणि विकसित करतील. या लँडिंग सिस्टमच्या माध्यमातून नासा आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवेल. सुरुवातीच्या डिझाइन डेव्हलपमेंट कामांसाठी नासा तीन कंपन्यांना एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7577 कोटी रुपये देईल. तिन्ही कंपन्यांना त्यांची आरंभिक रचना दहा महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे.

नासाचे प्रशासक जिम ब्रिडन्स्टाईन म्हणाले की, तिन्ही कंपन्यांशी झालेल्या करारानुसार आम्ही प्रथमच एका स्त्री आणि पुरुषास चंद्रावर पाठवत आहोत. कंपन्यांना त्यांच्या येण्या-जाण्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. असे एक यान विकसित करावे लागेल जे सहज आणि सुरक्षित असेल. जिमने स्पष्ट केले की अपोलो काळापासून नासाकडे मानवी लँडिंग सिस्टमसाठी पुरेसा निधी उपलब्ध असण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्टेमिस मिशनमध्ये काम करण्यासाठी आता आमच्याकडे बर्‍याच खाजगी आणि सरकारी कंपन्यांशी डील आहेत. या तिन्ही कंपन्या कशा कार्य करतील ते जाणून घेऊया.

या करारासाठी ब्लू ओरिजिन ही प्राथमिक कँडिडेट आहे. त्यांच्या टीममध्ये लॉकहीड मार्टिन, नॉर्थोप ग्रुमेन आणि ड्रॅपर हे आहेत. त्यांचा लँडर तीन टप्प्यांचा असेल. यात बीई -7 क्रायोजेनिक इंजिन असेल. लॉकहीड क्रू केबिन तयार करेल. नॉर्थोप ग्रुमेन कार्गो आणि इंधन मॉड्यूल्स आणि ड्रॅपर मार्गदर्शन, नेव्हिगेशन, कंट्रोल, एव्हिओनिक्स आणि इतर सॉफ्टवेअर सिस्टम तयार करेल.

डायनेटीक्सकडे एकूण 25 सब-काँट्रॅक्टर्स आहेत जे या मिशनमध्ये त्यासोबत काम करतील. या टीममध्ये बऱ्याच मोठ्या संरक्षण कंपन्या देखील आहेत. त्याच्या डिझाइनमध्ये आपल्याला दिसेल की तेथे अनेक मॉड्यूलर प्रोपेलेंट व्हीकल असतील. क्रू केबिन जमिनीपासून जास्त वर होणार नाही. तेथे दोन मोठ्या सौर पॅनेल असतील. यामुळे यान मध्ये चढणे आणि उतरणे सोपे होईल.

एलोन मस्कच्या स्पेस एक्समध्ये आर्टेमिस मिशनसाठी स्टारशिप आहे. यामधून केवळ चंद्रावरच नाही तर मंगळ आणि इतर ग्रहांपर्यंत देखील जाता येऊ शकेल. यात विश्वसनीय रैप्टर इंजिन आहे. क्रू केबिन बरेच मोठे आहे. तेथे दोन एअरलॉक आहेत जेणेकरुन मून वॉक सहज केले जाऊ शकते. हे वारंवार वापरण्यात येणारे रॉकेट आहे. त्याचे इंधन टँकर चंद्राभोवती फिरत असेल. याची आवश्यकता भासतात स्टारशिप मध्ये पुन्हा इंधन भरले जाईल. त्यानंतर दोघेही त्यांच्या गंतव्यस्थानावर रवाना होतील.

नासाच्या मानवी अन्वेषण व ऑपरेशन्स मिशन संचालनालयाचे सहयोगी प्रशासक डग्लस लोवरो म्हणाले की आम्ही योग्य मार्गावर आहोत. देशाची उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट कंपन्यांशी भागीदारी करत आहोत. येत्या 10 महिन्यांत आमच्याकडे बरेच काम आहे.