वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत बनवलं रक्‍त, कोणत्याही रूग्णाला दिलं जाऊ शकतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानमधील नॅशनल डिफेंस मेडिकल कॉलेजमध्ये कृत्रिम रक्त तयार करण्यात आले आहे. हे रक्त माणसांना देखील चढवले जाऊ शकते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना चढवण्यात येऊ शकते. हे रक्त एका वर्षापर्यंत सामान्य तापमानात राहू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, जपानी वैज्ञानिकांनी हे रक्त तयार केले असून यामध्ये रेड ब्लड सेल्स, ऑक्सीजन, प्लेटलेट्स देखील आहेत.

दहा सशांवर या रक्ताचे प्रयोग करण्यात आले असून यामधील सहा सशांचा जीव वाचला आहे. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांना हे रक्त देऊन जीव वाचवला जाऊ शकतो. सध्या अपघात झाल्यास रुग्णांना त्यांच्या रक्तगटाचे रक्त मिळण्यास मोठ्या अडचणी येतात. ओ-निगेटिव या रक्तगटाचे रक्त सर्व रुग्णांना मिळते , मात्र ते मिळणे फार दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत हे लॅबमध्ये तयार करण्यात आलेले रक्त मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, नॅशनल डिफेंस मेडिकल कॉलेजच्या वैज्ञानिकांनी आपल्या प्रयोगात या कृत्रिम रक्ताचा शोध लावला असून Transfusion नावाने आपले जर्नल देखील प्रसिद्ध केले आहे.

Visit : Policenama.com