‘रामायण’मधील ‘रावण’ अरविंद त्रिवेदींना व्हायचं होतं ‘केवट’, रामानंद सागर त्यांना पाहताक्षणी म्हणाले, ‘लंकेश’ !

पोलीसनामा ऑनलाईन :दूरदर्शनवर सुरू असणाऱ्या रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. आजही ते इंडस्ट्रीत आपल्या या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांचा रावण बनण्याचा किस्साही खूप इंट्रेस्टिंग आहे.

अरविंद याना रावणाचा रोल साकारायचा नव्हता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना या मालिकेत केवटचा रोल साकारायचा होता. यासाठी ते रामानंद सागर यांना विनंती करत होते.

https://www.instagram.com/p/B-tZuXJnf8D/

परंतु रामानंद सागर त्यांच्या या विधानासी सहमत नव्हते. त्यांनी काय विचार केला माहिती नाही परंतु रामानंद यांनी अरविंद त्रिवेदी यांना स्क्रिप्ट वाचायला लावली. त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर थोडी शांतता पसरली. जेव्हा ते स्क्रिप्ट परत करून जायला लागले तेव्हा रामानंद सागर यांनी रडत सांगितलं की त्यांन त्यांचा लंकेश म्हणजेच रावण मिळाला आहे.

https://www.instagram.com/p/B-rzoVThnhG/

अरविंद यांनी कोणताही डायलॉग न ऐकवता त्यांची रावण म्हणून निवड करण्यात आली होती. रामानंद सागर यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयानं अरविंद चकित झाले होते. अरविंद यांनी याचे कारण विचारले असता रामानंद सागर म्हणाले की, त्यांची चाल पाहूनच मी समजून गेलो की, ते रावण बनण्यासाठी योग्य आहेत. ज्यात बुद्धी बळ असेल आणि चेहऱ्यावर तेज असेल.

https://www.instagram.com/p/B-rzYwGBNR-/

खास बात अशी रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी मात्र रामभक्त आहेत. ते रामाच्या भक्तीत लीन असतात. गुजरातचे कलाकार अरविंद त्रिवेदी आता 81 वर्षांचे झाले आहेत. ते आता चालू फिरू शकत नाहीत. सध्या ते घरीच असतात. कध कधी ते अस्वस्थ असतात. सध्या ते रामायण पाहत आहेत. रामायण पाहतानाचा त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/p/B-rjLk7heUc/