आशा सेविकांचा विविध मागण्यासाठी ‘एल्गार’ आणि ‘जेलभरो’ !

पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा – ग्रामीण भागात आरोग्याची सेवा तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या आशा सेविकांना आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज चक्क जेलभरो आंदोलन करावे लागले.

शासनाच्या सेवेतील अतिशय महत्वाचा घटक असलेल्या आरोग्य विभागातील विविध योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी काम करत असले तरीही राज्याच्या गावागावात चोवीस तास काम करणाऱ्या आशा सेविका आजपर्यंत तुटपुंज्या मानधनावरच आहेत.
Asha Sevika Protest in Pune

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 69 हजार आशा सेविका तसेच 3500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. यासाठी कामावर आधारित मानधन म्हणून आशा सेविकांना रु. 2500 तर गटप्रवर्तकांना रु. 8725 इतका मोबदला मिळतो. यामध्ये वाढ करुन किमान अंगणवाडी सेविकांप्रमाणे कायम मानधन मिळावे व शासकीय सेविकांचा दर्जा मिळावा यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. परंतु आजपर्यंत काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे या आशा सेविकांनी दि. 4 सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन केले तरीही शासन काहीच निर्णय घेतला जात नसल्याने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्ह्यातील सर्व आशा सेविका व गटप्रवर्तकांनी मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले.

यामध्ये आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील, सलीम पटेल, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, शुभांगी दत्तात्रय जगताप, रेखा कुंजीर यांसह हजारो सेविका हजर होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like