‘त्यावेळी तोंडावर आपटलात आता झाकली मूठ ठेवा’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात त्यामुळे विधानसभेत झाकली मूठ ठेवा असं म्हणत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी विनोद तावडे नांदेडमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. यावेळी बोलताना तावडेंनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

विनोद तावडे म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये. लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात त्यामुळे विधानसभेत झाकली मूठ ठेवा.” असा सल्ला त्यांनी चव्हाणांना दिला. पुढे तावडे म्हणाले, “काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे लोकच त्यांना नाकारतील. अशोक चव्हाणांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.”

नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असून काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा समजली जात होती. मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता. आगामी विधानसभेत नुकसान टाळण्यासाठी काँग्रेसने डिझास्टर मॅनेजमेंटला सुरुवात केली आहे. राज्यातील 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा लढवण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत एक खास योजना तयार केली जात आहे. जे नेते कधीही विधानसभा लढले नाहीत त्यांनाही आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. परंतु काँग्रेसचा हा आदेश हे नेते पाळतील का असा खरा प्रश्न आहे.

Visit : policenama.com