अशोक चव्हाणांनी’ उधळला ‘विजया’चा गुलाल, बापूसाहेब गोरठेकर यांच्या पराभवाने भाजपला धक्का

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन – भोकर मतदारसंघात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी विजयाचा गुलाल उधळा आहे. काँग्रेसने आपला नांदेडचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे. भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. अशोक चव्हाण पहिल्यापासूनच आघाडीवर होतो. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोठे आव्हान उभे केले होते. परंतू अशोक चव्हाणांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भोकर मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. त्यांना १०००० मतं मिळाली असून बापूसाहेब गोरठेकर यांच्या पारड्यात ३५०० मतं पडली होती. त्यानंतर अशोक चव्हाण 10 फेरीत 22 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे बापूसाहेब गोरठेकर यांच्यासमोर मोठे आव्हान होते. हा लीड पार करणे कठीण होते.

महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. प्रारंभी 1962, 1964, 1972, 1978 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत २० वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे. 2014 मध्ये अमिता चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते त्यानंतर यावेळी खुद्द अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदार संघावर आतापर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले असून चव्हाण कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणूनही भोकरची ओळख आहे, वंचित बहुजन आघाडीने नामदेव आयलवाड तर बसपाने रत्नाकर तारु यांना उमेदवारी दिली होती.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com