शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अशोक पवार विजयी ; तर भाजपचे बाबूराव पाचर्णे पराभूत

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा ४१ हजार ५०४ मतांची आघाडी घेत घुव्वाधार विजय मिळवला आहे. शिरुर हवेली मतदार संघात विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अशोक पवार यांनी १लाख ४५ हजार १३१ मते मिळवुन ४१ हजार ५०४ मतांनी विजय मिळविला. तर भाजपा युतीचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना १ लाख ३हजार६२७ मते मिळाल्याने त्याचा पराभव झाला आहे .

शिरुर शहरातील कुकडी हाॅल येथे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सुरु केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण खाणापुरे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार राऊत, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पोलीस कर्मचारी, होमगार्ड, स्टायकिंग फोर्स सह चोख बंदोबस्त ठेवला होता. एकुण ६७.२१ टक्के मतदान झालेल्या या मतदार संघात सकाळी सुरू झालेल्या या मतमोजणीत सुरुवातीला ४९८ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी शिरुर शहर व पंचक्रोशीत आघाडी घेत आपली विजयी घोडदौड सुरू केली. ती सर्व शिरुर तालुका व हवेली तालुक्यातील सर्व ठिकाणी कायम ठेवली. त्यामध्ये दहावी फेरी अखेर अशोक पवार यांना ५०६४१, भाजपाचे बाबुराव पाचर्णे यांना ३८२४७ मते मिळाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस अशोक पवार यांनी १२३९४ मतांची आघाडी घेतली. तर सोळाव्या फेरीत २४४९६ मतांची आघाडी, तर पंचवीस व्या फेरीत ३४२८९ मतांची आघाडी घेत विजयांचा झेंडा लावला.

अशा प्रकारे झालेल्या मतमोजणीत मतांची वाढती आघाडी घेत सुमारे १ लाख ४५ हजार १३१ मते मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना विजयी घोषित करण्यात आले. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांना १लाख ३ हजार६२७मते मिळाली. मनसेचे कैलास नरके यांना १९२६ मते मिळाली. बसपाचे रघुनाथ भवर यांना ९०७मते, अमोल लोंढे यांना ७४१ मते, वंचित आघाडीचे उमेदवार चंदन सोंडेकर यांना ३१४० मते, चंद्रशेखर घाडगे यांना १७७मते, अपक्ष उमेदवार अ‍ॅड. नरेंद्र वाघमारे यांना ६१८ मते, पवार नितीन ३३२मते, सुधीर पुंगलिया यांना २३५मते, व नोटाला १८१९मते मिळाली. एकुणच भाजपाचे ताब्यात असलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला शिरुर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरघोस मताधिक्याने विजय मिळवून परत मिळविला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या विजयी झाल्यानंतर शिरुर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी मतदान केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत विजयाेत्सव साजरा केला.
शहरातून कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांची बाजार समिती कार्यालयापर्यत विजयी घोषणा देत मिरवणूक काढली. आपल्या विजयाबद्दल बोलताना शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी सांगितले की, हा विजय शिरुर हवेली मतदार संघातील सर्व सामान्य जनता व तरुणांचा विजय असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तरुणांना जी हाक मारली, त्या हाकेला ओ देत राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस मतदान केले. त्यामुळे हा विजय तरुणांचा व सर्व सामान्य आम जनतेचा आहे.

एका बाजूला जनशक्ति व एका बाजूला धनशक्ती होती, काही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आंबेगाव मध्ये मोठ्यांच्या गाडीत हिंडणारे सुद्धा राजरोसपणे विरोधी प्रचार करत होते. परंतु मतदारांनी त्याची कुठलीही तमा न बाळगता मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला.

Visit : Policenama.com