‘या’ 7 पैकी कोणताही एक उपाय केल्यास आयुष्यात कधीही भासणार नाही आर्थिक ‘अडचण’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारत एक असा देश आहे जिथे धनाची धार्मिक आणि सांस्कृतिकरित्या विधीवत पूजा केली जाते. मनुष्याच्या 4 पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) यांपैकी दुसरा पुरुषार्थ आहे धन. धनामुळे व्यक्तीचं आर्थिक जीवन तर सबल होतंच सोबतच त्याचा समाजिक स्तरही उंचावतो. परंतु धनाच्या अभावामुळे व्यक्तीला आपल्या भौतिक गरजा पूर्ण करता येत नाही. आज आपण ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलेले धन प्राप्तीच्या उपायांबाबत जाणून घेणार आहोत.

ज्योतिषातील धनाशी संबंधित घटक
ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपदा, वैभव, ऐश्वर्य, भौतिक सुख-संसाधन आदीचा घटन मानलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचं आर्थिक जीवन चांगलं सुरु राहतं. शुक्र कमजोर झाल्यानं आर्थिक अडचणी येतात. सोबतच बृहस्पति ग्रहाचा संबंध देखील संपत्तीशी आहे.

कुंडलीच्या दुसऱ्या घराला धन भाव म्हटलं जातं. या धन भावानं माणसाच्या आयुष्यात धनाची बचत होताना दिसते. कुडलीचं अकरावं घरही उत्पन्नाशी संबंधित आहे. या भावामुळं माणसाची कमाई दिसते. आर्थिक जीवन मजबूत करण्यासाठी कुंडलीतील दुसरं आणि अकरावं घर मजबूत असणं खूप गरजेचं आहे.

ज्योतिषनुसार, धन प्राप्तीसाठी काही सोपे उपाय
1)
कुंडीलीतील शुक्र आणि गुरु ग्रहाची स्थिती मजबूत करावी.
2) कुंडलीतील दुसरा आणि अकरावा भाव आणि या भावांच्या मालक ग्रहांना मजबूत बनवा.
3) शुक्रवारच्या पूजेत श्रीसूक्ताचा पाठ करावा.
4) तुलशीचं रोप लावून त्याची पूजा करावी.
5) दररोज घराची साफसफाई करावी.
6) धनाचे देवता कुबेरची पूजा करावी.
7) श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र आणि श्री धन वर्षा यंत्र यांची स्थापना करून त्याची पूजा करावी.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/