नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसकडून आणखी दोघांना अटक

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात एटीएसने जळगावच्या साकली गावातील दोघांना अटक केली आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत. वासुदेव सूर्यवंशीला याआधीच एटीएसने ताब्यात घेतले होते.

दोघांनाही आज सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूर्यवंशी याने अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडादरम्यान वाहनाची व्यवस्था केल्याचा एटीएसला संशय आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सूर्यवंशी हा तरुण कर्की ता. मुक्ताईनगर येथील मुळ रहिवाशी असून त्याच्या वडीलाचे निधन झाल्यानंतर तो आई व आजी सोबत साकळी येथे मामाकडे राहण्यास आला. प्लॉट भागात स्वत:चे घर आहे. त्याचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. गेल्या ८-१० वषार्पासून तो साकळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. एटीएसची दोन पथके साकळीत दाखल झाली होती. त्यांनी सूर्यवंशी याला ताब्यात घेतल्यानंतर अज्ञातस्थळी हलविले़ त्याच्या घराची सुमारे अडीच तास झडती घेण्यात आली.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ९ आॅगस्टच्या रात्री नालासोपाºयातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरी धाड टाकली. या धाडीत त्यांना स्फोटके सापडली. याप्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना १० आॅगस्टला अटक केली.
[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43b7d887-b408-11e8-a554-c1ba399d3ef1′]
नालासोपाºयात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. मग एटीएसने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून १८ आॅगस्टला रात्री अटक केली. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
[amazon_link asins=’B00PQKR85E,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d81dd35-b408-11e8-a372-430e613a1cd5′]