भरधाव ट्रकची मोपेडला धडक, पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव ट्रकने मोपेडला दिलेल्या जोरदार धडकेत मोपेडवरील पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास बीड बायपासवरील एमआयटी चौकात झाला. जखमी पतीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. स्नेहल बावळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आज दुपारी दीडच्या सुमारास एमआयटी चौकात (एमएच२०-डीयू-३९२७) या मोपेडवरून स्नेहल बावळे या आपल्‍या पतीसोबत चालल्‍या होत्‍या. यावेळी त्‍या तीन मोठे सामानाचे बाँक्स घेऊन बसल्‍या होत्‍या. यादरम्‍यान त्‍या महानुभाव चौकाकडे जात असताना, बाँक्सला भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकचा धक्का बसला. त्यामुळे मोपेडवरील स्‍नेहल यांचा तोल जाऊन त्‍या खाली पडल्‍या आणि ट्रकच्या( एमएच१८-बीए-२७४९) टायरखाली आल्‍या.

यावेळी ट्रकचे चाक स्‍नेहल यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मत्यू झाला. यावेळी वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी स्वार पतीला बाजूला ओढल्यामुळे तो जखमी झाला व त्‍याचे प्राण वाचले. यानंतर त्‍याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारांसाठी रवाना करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा

भ्रष्टाचाराच्या आरोपावर पंकजा मुंडे म्हणतात…

पंकजांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा मोदी स्टाईल प्रचार

भाजप कार्यकर्त्याची गुंडगिरी : कंपनीत घुसून मॅनेजरला मारहाण

कबड्डीपटूची भूमिका असलेला कंगनाचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित