उपाशीपोटी केळी खाताय ? होऊ शकतात ‘हे’ त्रास ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यात आरोग्यवर्धक चरबी असते. यामुळं वजन नियंत्रणात राहतं. यामुळं लठ्ठपणाही कमी होतो. फक्त ते खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत अनेकांना माहित नसते. अनेकजण सकाळी उपाशीपोटी याचं सेवन करतात. परंतु असं केल्यास अनेक समस्या येऊ शकतात. त्या कोणत्या आहेत याबद्दल आज माहिती घेणार आहोत.

1) पचनासाठी हानिकारक – केळीत पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतं. तज्ज्ञ सांगतात की, उपाशीपोटी अ‍ॅसिडीक खाद्य पदार्थ खाणं पचनाशी निगडीत समस्या निर्माण करू शकतात. म्हणून उपाशी पोटी केळ खाऊ नका.

2) हृदयासाठी चांगलं नाही – केळीत पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतं. जर उपाशीपोटी याचं सेवन केलं तर रक्तात दोन्ही घटक जास्त प्रमाणात होऊ शकतात. यामुळं हृदयाला हानि पोचू शकते.

3) थकवा आणि सुस्ती – जर तुम्ही उपाशीपोटी केळ खाल्लं तर तुम्हाला त्वरीत ऊर्जा तर मिळेल परंतु ती तात्पुरती असेल. यामुळं लगेच थकवा आणि सुस्ती जाणवेल आणि परत भूक लागेल. त्यामुळं आपल्याला अति खाण्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. नाष्त्यात याचा समावेश असावा. परंतु उपाशीपोटी याचं सेवन करू नये.

4) रात्री झोपण्यापूर्वी केळी खाऊ नये – अनकेजण रात्री झोपण्यापूर्वी केळी खातात परंतु असं करू नये. असं केल्यास तु्म्ही आजारी पडू शकता. यामुळं खोकलाही येऊ शकतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.