WhatsApp वापरत असाल तर चूकन देखील ‘हे’ Apps डाऊनलोड करू नका, जाणून घ्या

वृत्तसंस्था – गूगल प्ले स्टोरवर Play Protect असताना देखील अनेक Apps तुमच्या मोबाईलमधील माहिती घेत असतात. पब्लिशर्स हे App वेगवेगळया नावांनी Google Play Store वर अपलोड करत असतात. गूगलकडून वेळावेळी अशा प्रकारचे Apps प्ले स्टोरवरून काढून टाकले जातात. मात्र, डेव्हलपर्स आणि पब्लिशर्स हे अशा अ‍ॅप्सला वेगवेगळया नावांनी आणि वेगवेगळया पध्दती शोधून गूगल प्ले स्टोरवर अपलोड करतात.

गूगल प्ले स्टोर सोडून काही अशा वेबसाईटस् आहेत की जिथं एंड्रॉइड अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. यायाच फायदा हॅकर्स घेतात आणि व्हॉटस्अ‍ॅप आणि स्मार्टफोनला टार्गेट करतात. तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर निश्चितच त्याची चॅटिंग ही तुमच्यासाठी खासगी असते आणि ती तुम्हाला कोणासोबत देखील शेअर करण्यास आवडणार नाही. मात्र, असे अनेक अ‍ॅप्स आहेत की जे WhatsApp मधील डाटा संकलित करत असतात. आम्ही अनेक वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp शिवाय WhatsAppला सपोर्ट करणारे Apps पाहिले आहेत.

WhatsApp चे सपोर्ट Apps म्हणजेच थर्ड पार्टी पब्लिशर्सव्दारे तयार केलेले अ‍ॅप्स असतात. जे WhatsApp मध्ये काही नवीन फिचर्स समाविष्ट करण्याचा दावा करतात. एवढेच नाही तर काही अ‍ॅप्स तर एका नंबरवरून दोन WhatsApp अकाऊंट चालविण्याचा दावा देखील करतात.

गूगल प्ले स्टोरवर WhatsApp लिहून सर्च केल्यास पहिल्या आणि दुसर्‍या नंबरवर ऑफिशियल WhatsApp पहावयास मिळतं. मात्र, त्यानंतर एक लांबलचक यादी सुरू होते जी WhatsApp शी जोडलेली असते आणि त्यामध्ये जास्तकरून तुमच्या WhatsApp अकाऊंटसाठी खुपच हानीकारक असते.

WhatsApp Plus, WhatsApp Gold हे असे Apps आहेत की जे अनेक वेबसाईटव्दारे डाऊनलोड केले जाऊ शकतात. हे Apps बनावटी आहेत आणि जसंही तुम्ही या अ‍ॅप्सला परवानगी देतात तसं ते अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनमधून डाटा करून घेण्यास सुरवात करतात. खासकरून ते अ‍ॅप्स ते तुमच्या WhatsApp मधील डाटा संकलित करतात.

काही Apps असा दावा करतात की, तुम्ही ऑनलाइन असताना देखील ते तुम्हाला ऑफलाइन दाखवु शकतात. काही असे अ‍ॅप्स आहेत की जे दावा करतात एकाच नंबरवर दोन WhatsApp अकाऊंट चालवु शकतात. अशाच प्रकारचे WhatsApp ऑटो रिप्लाय, सर्च फ्रेन्ड ऑन व्हॉटस्अ‍ॅप, WhatsApp मेसेज शेडयूलर आणि WhatsApp क्लिनर अ‍ॅप्स हे आहेत.

तुम्ही चुकून देखील व्हॉअस्अ‍ॅपशी जोडलेले अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. कारण की कंपनी हाच सल्ला दिला आहे की, WhatsApp कडून सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी WhatsApp अ‍ॅप आहे आणि व्यापारी वापरकर्त्यांसाठी WhatsApp Business. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं WhatsApp तुमच्यासाठी आणि स्मार्टफोनसाठी नुकसानकारक होऊ शकतं.

Visit : Policenama.com