Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

अयोध्या : अयोध्या (Ayodhya Deepotsav 2021) मध्ये राम मंदिराचे (shri Ram temple) बांधकाम सुरू असल्याने येथे दिवाळी (Diwali) धुमधडाक्यात साजरी करण्याची तयारी सुरू आहे. येथे पुन्हा एकदा दीपोत्सव (Ayodhya Deepotsav 2021) साजरा केला जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक विक्रम होणार आहे. श्रीराम पॅडीमध्ये 9 लाख दिवे एकाचवेळी प्रज्वलित करून जागतिक विक्रम केला जाईल.

अयोध्या शहरात (Ayodhya) तीन लाख अतिरिक्त दिवे लावले जातील. अशाप्रकारे एकुण 12 लाख दिवे एकाचवेळी प्रज्वलित होतील. हा कार्यक्रम 3 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत होईल.

यादरम्यान 3 डी होलोग्रॅफिक शो, लेजर शो आणि आतषबाजीची (3D holographic shows, laser shows and fireworks) सुद्धा व्यवस्था केली आहे. येथे रामलीला मंचनसाठी श्रीलंकेच्या सांस्कृतिक मंडळाला आमंत्रित करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

या दरम्यान वेगवेगळ्या दिवशी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
पहिल्या दिवशी 1 नोव्हेंबरला जनकपुर (नेपाळ) च्या सांस्कृतिक मंडळाकडून सुद्धा रामलीला मंचन होईल.
पाच दिवसाच्या कार्यक्रमात जम्मू काश्मीर, गुजरात, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या रामलीलांचे सुद्धा मंचन होईल.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Pune Crime | १९ वर्षीय तरूण सहकार्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे प्रकरण ! यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Gold Silver Price Today | दिवाळीआधी खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ayodhya Deepotsav 2021 | ayodhya deepotsav 2021 12 lakh earthen diya will lit together know the full program here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update