अयोध्येत सुरू झालं राम मंदिराचं बांधकाम, ट्रस्टनं अकाऊंट नंबर जाहीर करत केलं दान करण्याचं आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अयोध्येत भगवान राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. बुधवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत रामलल्ला यांना भेट दिली होती आणि राम मंदिराचे भूमिपूजन केले होते. आता राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. ट्रस्टने बुधवारी खाते क्रमांक आणि अन्य माहिती शेअर केली आहे, ज्याद्वारे लोक देणगी देऊ शकतील.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी बुधवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ते म्हणाले की, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केले होते, आता मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. चंपत राय यांच्यानुसार, कोट्यावधी रामभक्तांना मंदिर बांधकामात दान करायचे आहे, त्यानंतर ट्रस्टच्या वतीने देणगी देण्याची सर्व माहिती दिली जात आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या वतीने ट्विटमध्ये लिहिले गेले, ‘जय श्री राम! भगवान श्री राम यांच्या पवित्र जन्मस्थळावर त्यांचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्याचे काम माननीय पंतप्रधानांनी भूमिपूजन केल्यानंतर सुरू झाले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र सर्व श्री राम भक्तांना आवाहन करते की, मंदिर बांधकामासाठी शक्य तितके दान करा.’

पंतप्रधानांनी केली होती पायाभरणी, नव्या संरचनेसह बांधणार मंदिर

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून ट्रस्ट तयार करण्यात आले होते, ज्यांच्याकडे राम मंदिराच्या कारभाराशी संबंधित अधिकार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रस्टने भूमिपूजनासाठी आमंत्रण पाठवले होते, त्यानंतर पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य संत राम मंदिर भूमीपूजनात सहभागी होते. या दरम्यान पीएम मोदी म्हणाले की, राम मंदिर देशात एकतेचा नवा धागा होईल आणि इतिहास निर्माण होईल.

विशेष म्हणजे राम मंदिराच्या मूळ मॉडेलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, त्यानंतर आता मंदिराची उंची जास्त असेल. आता मंदिर ३०० फूट उंच असेल, तर तीन मजले असतील. या व्यतिरिक्त नवीन नकाशामध्ये ३ घुमटऐवजी ५ घुमट ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिरात ३१८ खांब असतील आणि प्रत्येक मजल्यावर १०६ खांब बांधले जातील.