Ayodhya Case : जाणून घ्या निकालाच्या बाबतीत सकाळपासून घडलेल्या 14 घडामोडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होतं. जाणून घ्या या निकालाच्या बाबतीत सकाळपासून घडलेल्या घडामोडी –

1) 9.50 – अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे पाचही न्यायाधीश कोर्टात दाखल

2) 10.20 – सरन्यायाधीश रंजन गोगाई कोर्टात पोहोचले

3) 10.28 – अयोध्या निकालाच्या निर्णयाची प्रत सुप्रीम कोर्टात पोहोचली.

4) 10.30 – निकाल वाचनाला सुरुवात.

5) 10.38 – शिय्या वक्फ बोर्डाची याचिका फेटाळण्यात आली. निर्मोही आखाड्याचा दावा ही कोर्टाने फेटाळला.

न्यायालयाने दिलेले निर्णय –

6) 10.42 – बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसून याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं.

7) 10.45 – रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही

8) 10.46 – जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल

9) 10.52 – 12 व्या आणि 16 व्या शतकात या जागी काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही

10) 10.55 – आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल

11) 11.01 – इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही

12) 11.10 – मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देण्याचे आदेश

13) 11.12 – रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश

14) 11.20 – राम मंदिर बांधण्यासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like