12 वीच्या विद्यार्थ्याने महिलांच्या फोटोंबरोबर छेडछाड करून बनवला टिकटॉक व्हिडीओ : पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील आझमगडमध्ये पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. महिलांच्या फोटोंबरोबर छेडछाड करून त्याचे टिकटॉक व्हिडीओ बनवल्यामुळे पोलिसांनी या मुलाला अटक केली असून महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या 18 वर्षीय आरोपी पंकज साहनी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लग्नामध्ये या महिलांसोबत आरोपीची ओळख झाली होती. यावेळी त्यांनी काही फोटो बरोबर काढले होते. त्यानंतर त्याने या फोटोंबरोबर छेडछाड करत त्याचा व्हिडीओ बनवत तो फेसबुक आणि टिकटॉकवर अपलोड केला. याविषयी बोलताना आझमगडचे पोलीस अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी म्हटले कि, आम्ही या प्रकरणी टिकटॉकला एका नोटीस पाठवत असून यामध्ये ते

अपराधीक कृत्य रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत याची माहिती त्यांना मागणार आहोत. तसेच पुढे अशाप्रकारची कृत्ये व्हावी नाहीत याची खबरदारी घेण्याचे देखील त्यांना आवाहन करणार आहोत. दरम्यान, या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरु असल्याचे पोलसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com 

You might also like