Baaghi 3 चं ट्रेलर रिलीज : ‘अ‍ॅक्शन’, ‘इमोशन’नं भरपूर, टायगर श्रॉफचा पॉवरफुल ‘पंच’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमात टायगरची दमदार अ‍ॅक्शन, फाईट तसेच वॉर लोकेशन दिसत आहेत. या नात्यांचा इमोशनल टच दिसत आहे. या ट्रेलरमध्ये अनेक ठिकाणी भाईजान सलमान खानच्या टायगर जिंदा है या सिनेमाची आठवण येते.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ मोठ्या मशीन्स आणि हॅलिकॉप्टर्समध्ये खतरनाक स्टंट्स करताना दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमातील स्टोरीचा काही प्रमाणात अंदाज येतो. सिनेमात जबरदस्त अॅक्शन दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसतंय की टायगर आपल्या भावाला वाचवण्यासाठी सीमा ओलांडण्यासाठी तयार आहे. तो भावाला वाचवण्यासाठी अगदी सीरीया पर्यंत जात आहे. त्याच्या भावाची भूमिका रितेश देशमुखनं साकारली आहे. ट्रेलर पाहताना अनेक ठिकाणी टायगर जिंदा हैची आठवण होते. टायगरची शर्टलेस अ‍ॅक्शन, लोकेशनवर गाड्यांचं जळणं काही अंशी टायगर जिंदा है सोबत मिळतं जुळतं आहे.

अहमद खान दिग्दर्शित बागी 3 सिनेमात टायगर आणि श्रद्धा लिड रोलमध्ये आहे. सिनेमाबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. टायगर आणि श्रद्धाची केमिस्ट्री बागीनंतर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा व्यतिरीक्त रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, आशुतोष राणा, सतीश कौशिक, चंकी पांडे, नोरा फतेही, अनु कपूर हे कलाकार देखील आहे. 6 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.