चुरशीच्या लढतील भाजपचे बबनराव पाचपुते विजयी, राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव झाला. भाजप आणि राष्ट्रवादीतील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. भाजपच्या बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे घनशाम शेलर यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून दोघांत आघाडी-पिछाडी दिसून आली. या मतदारसंघात 61.74 टक्के मतदान झाले. भाजपने बबनराव पाचपुतेंसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. मागील निवडणूकीत बबनराव पाचपुते यांचा पराभव झाला होता. बबनराव पाचपुतेंनी फक्त 4750 मतांनी विजय मिळवला.

दुपारी 5.15 वाजता बबनराव पाचपुते यांना 95,254 मतांनी आघाडीवर होते, तर घनश्याम शेलार यांना 90,581 मते होती. या दोघांत चुरस सुरुच होती. परंतू बबनराव पाचपुते हे 5 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे बबनराव पाचपुते यंदा विजयाचा गुलाल उधळणार हे निश्चित झाले होते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल जगताप यांनी 99 हजार 281 एवढी मते घेत विजय मिळवला. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे बबनराव पाचपुते होते. त्यांना 85 हजार 644 मते मिळाली होती, तर त्यांचा 13 हजार 637 मतांनी पराभव झाला. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे शशिकांत गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे हेमंत ओगले आणि पाचव्या क्रमांकावर NOTA चे नोटा होते.

1. पाचपुते बबनराव भिकाजी (भारतीय जनता पार्टी) – 103258 मते – (विजयी उमेदवार)
2. घनश्याम प्रतापराव शेलार (राष्ट्रवादी) – 98508
3. सुनिल लक्ष्मण ओहळ (बहुजन समाज पार्टी) – 1149 मते
4. जठार बाळु आप्पा (पीजन्ट्स अ‍ॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) – 382 मते
5. टिळक गोपीनाथ भोस (संभाजी ब्रिगेड पार्टी) – 1195 मते
6. तात्याराम बलभीम घोडके (बहुजन मुक्ति पार्टी) – 291 मते
7. मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित बहुजन अघाडी) – 3175 मते
8. प्रमोद बाजीराव काळे (अपक्ष) – 294 मते
9. राजेंद्र निळकंठ नागवडे (अपक्ष) – 326 मते
10. सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष) – 267 मते
11. हरीषचंद्र पाटीलबुवा पाचपुते (अपक्ष) – 891 मते
12. NOTA – 1575 मते

Visit : Policenama.com