जमातींवर भडकली ‘रेसलर’ बबीता फोगाट, आता मिळत आहेत शिव्या अन् धमक्या ! म्हणाली- ‘मी जायरा वसीम नाही जी…’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –काही दिवसांपूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेली रेसलर बबीत फोगाट हिनं धमकवणाऱ्यांना आता चेतावणी दिली आहे. ती गप्प बसणार कायम बोलत राहणार असंही ती म्हणाली. बबीतानं काही दिवसांपूर्वी एक दोन ट्विट केले होते ज्यावरून वाद झाला. यानंतर आता तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, काही दिवसांपूर्वी तिनं जे काही ट्विट केले होते त्यानंतर तिला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आणि फोन करून काही लोक शिवीगाळ करत आहेत, धमकी देत आहेत. 2014 ची कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट बबीतानं अशा सर्व लोकांना चेतावणी दिली आहे की, सर्वांनी कान उघढे ठेवून ऐका की, ती काही जायरा वसीम नाही जी अशा धमक्यांना घाबरून घरात बसेल.

ती म्हणते, की, ती असली बबीता फोगाट आहे जी देशासाठी कायमच लढत आली आहे आणि पुढेही लढणार. बबीता म्हणते की, ट्विटमध्ये तिनं जे काही बोललं होतं त्यावर ती अजूनही कायम आहे आणि पुढेही राहणार कारण तिनं फक्त त्या लोकांच्या विरोधात लिहिलं आहे ज्यांनी संक्रमण पसरवलं आहे.

बबीतानं लोकांना सवाल केला की, जमाती आजही नंबर एकवर नाहीत का ? तबलिगींची संख्या अजूनही नंबर एकवर नाही का. जर त्या लोकांनी संक्रमण पसरवलं नसतं तर अद्याप लॉकडाऊन ओपन झालं असतं आणि कोरोनाही भारताकडून हारला असता.

बबीत म्हणाली जमीत नंबर एक

बबीतानं ट्विट करत म्हटलं की, कोरोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. जमाती अजूनही पहिल्या नंबरवर आहेत. बबीताच्या या ट्विटचा अनेकांनी विरोध केला आहे.