‘लॉकडाऊन’मध्ये पेटींग बनवण्यात व्यस्त आहे ‘बेबी डॉल’ सनी ! ‘अशी’ केली मुलांनी मदत (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी सध्या आपल्या पती आणि मुलांसोबत टाईम स्पेंड करत आहे. या काळात सनी आपला पेंटींगचा छंद जोपासताना दिसत आहे. सनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या पेटींगचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. आता तिची पुढील पेंटींगची तयारी सुरू आहे. सनीनं याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तिची पूर्ण फॅमिली पेंटींगचा बेस बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून पेंटींगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिची मुलंही पेंटींग एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना सनीनं खास कॅप्शनही दिलं आहे. सनी म्हणते, “फॅमिली आर्ट पती के साथ. मुलं, डॅनियल आणि नथालिना यांनी माझ्या पुढच्या पेंटींगचा बेस तयार केला आहे.”

पुढे बोलताना सनी म्हणते, “ऑफिशियली मी पेंटींग मोडमध्ये आहे. मी लकी आहे की है सर्व माझ्या जवळ आहेत. पेंटींग फायनल झाल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन.”

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.