बाटलीनं दूध पीत होतं हात्तीचं पिल्लू, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले – ‘क्यूट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कधी-कधी सोशल मीडियावर असे फनी व्हिडिओज वायरल होतात की ते पाहून कुणाचेही मन प्रसन्न होते. असाच एक व्हिडिओ सध्या खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये हात्तीचे एक पिल्लू बाटलीने दूध पीत आहे.

Sheldrick Wildlife नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. कॅपशनमध्ये लिहिले आहे की, बाटली रिकामी झाल्यानंतर सुद्धा रोहो ने ती तोपर्यंत सोडली नाही जोपर्यंत एक थेंबही शिल्लक राहिला नाही. रोहो आमच्या नर्सरीमध्ये लाडात वाढतोय, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.

व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, हात्तीच्या पिल्लाच्या तोंडाजवळ दुधाने भरलेली बाटली नेण्यात आली, आणि ताबडतोब तो दुध पिण्यासाठी सरसावला. हळुहळु त्याने संपूर्ण बाटली संपवली.

बाटली रिकामी केल्यानंतर अजून काही दूध शिल्लक आहे का हे तो पाहात होता. हात्तीच्या पिल्लाच्या या हालचाली पाहून प्रत्येकजण हसत आहे. बाटलीने त्याला दुध पाजणारा व्यक्तीसुद्धा हसताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी पसंत केला आहे. जो सध्या मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे.