‘एअर स्ट्राईक’पासून पाकिस्तान ‘नरमला’, घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी ‘घसरले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मागील सहा महिन्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यात पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला आणि त्यावर भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता पाकिस्तानमधून सीमेवर होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला आहे. त्यावरून या घटनेचा पाकिस्ताने धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयातील राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी या संदर्भातील संसदेत अहवाल सादर केला. यात बालाकोट एअर स्ट्राईकनंतर सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सुरक्षा दलांच्या नियंत्रण आणि समन्वयामुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारली असून आता ती आटोक्यात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत पाकिस्तानच्या घुसखोरीचे प्रमाण घटल्याचे नित्यानंद राय यांनी अहवालात सांगितले आहे.

केंद्र सरकारने पाकिस्तानच्या घुसखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. यात सीमाभागात सुरक्षा दलांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी कुंपण घालण्यात आले होते. तसेच गुप्तचर विभाग आणि सुरक्षा दलांमधील समन्वय वाढवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने जशास-तसे उत्तर दिले. बालाकोट परिसरकातील जैश-ए-मोहम्मदचे तळ हवाई हल्ले करून उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ला केला होता, मात्र त्यावर भारताने चांगले प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय