कौतुकास्पद ! मंदिराला वाचवण्यासाठी मुस्लीम तरुणांनी तयार केली मानवी साखळी, व्हिडीओ व्हायरल

बंगळुरू : वृत्तसंस्था – बंगळुरूत काल रात्री जातीय हिंसाचार भडकला होता. उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकाने प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी सोशल मीडियावर एक अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला होती. त्यावेळी हिंसक जमावाने एका मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुस्लीम तरुणांनी या मंदिरासमोर मानवी साखळी तयार करुन मंदिराला नुकसान होण्यापासून वाचवले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंसक जमाव मंदिरालाच्या दिशेने येत होते. त्यावेळी काही मुस्लीम तरुणांना मंदिरासमोर मानवी साखळी तयार करण्यात सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी तरुण जमावाला, अल्लाहसाठी तरी हे करू नका, असे सांगताना ऐकू येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी मी आमदाराचा पुतण्या असल्याचे सांगणार्‍या नवीन नावाच्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे. त्याने फेसबूक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचे नवीनने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, बेंगळुरूमध्ये सीआरपीसीचा कलम 144 लागू करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे.