बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, अर्जासाठी 30 मे पर्यंत मुदत

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती होणार आहे. बँक ऑफ इंडियात विविध पदांवर ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट अशी विविध पदे भरली जाणार आहेत. ही भरती राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणार आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या

1. पदाचे नाव – फॅकल्टी
पदांची संख्या – 03
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर, सांगली
अनुभव – 2 ते 5 वर्षे
वेतन – दरमहा 20 हजार रुपये
अर्ज करण्याची मुदत – 30 मे 2020

2. पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट
पदांची संख्या – 02
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर, सांगली
अनुभव – फ्रेशर
वेतन – 15 हजार रुपये दरमहा
अर्ज करण्याची मुदत – 30 मे 2020

3. पदाचे नाव – अटेंडंट
पदांची संख्या – 01
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अनुभव – फ्रेशर
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 30 मे 2020

अर्ज करण्याचा पत्ता

झोनल ऑफिस, बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर, 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, पी.बी. नंबर. 5 कोल्हापूर – 416002

इच्छूक उमेदवारांनी 30 मे 2020 पूर्वी अर्ज करायचे आहेत. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांची प्रति जोडणे आवश्यक आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पदांसांठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.