बापू नायर टोळीचा गैंगस्टर पिस्तूलासह गजाआड 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बापू नायर टोळीच्या गैंगस्टरला गुन्हे शाखा युनिटी -३ च्या पोलिसांनी पिस्तूलासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांनी खडकी येथे केली. अटक करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मागील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

नितेश श्रीनीवास बसवंत (वय-२६ रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे दोन पिस्टल, दोन जीवंत काडतुसे, वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाईल फोन, ११ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19453c6f-b5c6-11e8-a461-7d38de1e3109′]

नितेश बसवंत हा बापू नायर टोळीचा सदस्य होता. २०१५ पासून पोलीस त्याच्या मागावर होते. नितेश बसवंत विरुद्ध मारामारी, खंडणी, शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट -३ चे पोलीस नाईक संदिप तळेकर यांना  नितेश बसवंत खडकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार युनिट-३ च्या पथकाने खडकी परिसरात सापळा रचून नितेशला अटक केली.

नितेश बसवंत याने २०१५ साली कांढवा येथे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी त्याला मोक्का लावला होता. सतत घर बदलत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान, तो लातूरला पळून गेला. त्या ठिकाणी भाड्याचे घर घेऊन तो रहात होता. पुण्यामध्ये नातेवाईकांना भेटायला येणार असल्याची माहिती युनिट -३ च्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
[amazon_link asins=’B07417987C,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f6c669d-b5c6-11e8-bf68-e50fa67980e9′]

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस सह आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस कर्मचारी संदीप तळेकर, अशोक भोसले, रोहीदास लवांडे, गजानन गाणबोटे, अतुल साठे, सुजीत पवार, मच्छिंद्र वाळके, शिवानंद स्वामी, निलेश पाटील, संदीप राठोड, कल्पेश बनसोडे यांच्या पथकाने केली.

बघूया कोणाचे नशीब जोरावर ? … तिने ट्रिगर दाबला … अन एकच किंकाळी …