सावधान ! उपाशीपोटी ‘या’ 5 गोष्टी मुळीच करु नका? चांगलेच पडेल महागात; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असते. कामाच्या व्यापामुळे नंतर खाऊ अशी चालढकल केली जाते. शिवाय उपाशी राहण्याने आणि जेवणाकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हाणीकारक आहे. उपाशी राहण्यामुळे जसे आरोग्याचे नुकासान होते. तसे इतर देखील तोटे होतात. जे तुमच्या नात्यांसाठी किंवा कार्यक्षमतेसाठी धोक्याचे आहेत. उपाशी राहण्याचे पाच तोटे आहेत. जाणून घ्या.

उपाशीपोटी निर्णय घेणे घातक

ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी आपण घेतलेला निर्णय चुकीचा निघतो असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. नेदरलँडच्या युट्रेच विद्यापीठाच्या संशोधन कर्त्यांचे असे म्हणणे आहे की, उपाशीपोटी असलेला व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो, आणि असे घेतलेले निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते.

उपाशीपोटी व्यायाम करणे

असा एक गैरसमज असतो की उपाशी पोटी व्यायाम करणे शरीराला फायद्याचे असते. मात्र असे अजिबात करु नका. उपाशीपोटी व्यायाम केल्याने तुम्हाला व्यायाम करताना इजा होऊ शकते. याशिवाय व्यायाम करताना तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी पडू शकते. त्यामुळे कोणताही व्यायाम करण्यापूर्वी हलका आहार आवश्यक घ्या. हे तुमच्यासाठी उत्तम आहे.

उपाशीपोटी राग लगेच येणं

उपाशीपोटी असाल तर लगेच राग येतो. यामुळे या दरम्यान तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता असते. मात्र तुम्ही तसे करुन नका. उपाशी असल्याने भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही असे काही बोलून जाता की ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

उपाशीपोटी तिखट खाणं

जर उपाशी असाल तर तिखट खाणे टाळा. यामुळे पोटात जळजळल्यासारखे होईल. जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल तर उपाशीपोटी आधी साधी न्याहरी करा आणि मग तुमच्या आवडीच्या तिखट पदार्थाचे सेवन करा.

उपाशीपोटी खरेदी करणं

उपाशीपोटी तुम्ही जर खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. उपाशीपोटी खरेदी करताना अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते. तसेच गोड पादार्थ, मिठाई, कार्बोहायट्रेड युक्त पदार्थ इत्यादी खरेदी करण्याची जास्त शक्यता जास्त असते.