तुम्हाला माहित आहे का ? दुधानेही खुलवता येते ‘सौंदर्य’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी दूध हे लाभदायक आहे. पूर्णान्न असल्याने लहान मुलांना आवर्जून दुध दिले जाते. तसेच दूधाचे इतरही पदार्थ पौष्टिक असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. याशिवाय दूध हे सौंदर्यासाठी देखील उपयोगी आहे. दुधाचा वापर करून आपण आपले सौंदर्य खुलवू शकतो, हे फार कमी लोकांना माहित आहे. दुधाचे सौंदर्यासाठी कोणकोणते फायदे आहेत, याविषयीची माहिती घेतल्यास सौंदर्य खुलवणे सापे होऊ शकते.

फेशिअल क्लिनझरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. शिवाय यामध्ये असलेल्या काही रसायनांमुळे त्वचेवर पुरळ उठण्याचे प्रकार घडत असतात. परंतु दूध हे नैसर्गिक सौम्य फेशिअल क्लिनझर असल्याने नैसर्गिकरित्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ दूर करता येते. चेहऱ्यावर कापसाच्या बोळ्याने दूध लावून कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे कोणत्याही प्रकारची त्वचेची हानी होण्याची शक्यताही नसल्याने हा उपाय खूपच विश्वासार्ह आहे. कोरडेपणा, खाज आणि फायइ लाईन्स ही त्वचा मॉईश्चर नसल्याची लक्षणे आहेत. दूध हे नैसर्गिक आणि कमी खर्चिक मॉईश्चरायझर असल्याने कोरड्या त्वचेवर कापसाच्या बोळ्याने दूध लावावे. त्यानंतर काही मिनिटांनी धुवून टाकावे.

दुधासोबत केळंदेखील वापरल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होईल. दुधामध्ये नैसर्गिक सौम्य असिड असल्याने त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यात आणि त्वचेला उजाळा मिळतो. दुधात रॉ ओटमिल किंवा ब्राऊन शुगर मिक्स करून त्वचेवर लावावी. या नैसर्गिक डेड स्किन रिमुव्हरमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. उन्हामुळे त्वचेवर डार्क स्पॉट येतात. यावरही दूध गुणकारी आहे. यासाठी दुधात असलेल्या सौम्य असिडमुळे ही समस्या दूर करता येऊ शकते. दूध आणि बटाट्याचा रस समप्रमाणात घेऊन झोपण्यापूर्वी हे मिश्रण त्वचेवर लावावे. दूध हे टोनरप्रमाणे करत असल्याने त्वचेच्या आतील घाण बाहेर येते.

त्वचेवरील छिद्र मोठी झालेली असल्यास तीदेखील छोटी होतात. यासाठी कच्चे दूध थंड असताना चेहऱ्यावर लावावे. पायांना आराम मिळण्यासाठी दूध उपयोगी आहे. १ लीटर कोमट पाण्यात २ कप गमर दूध, ४ टिस्पून मीठ आणि शाम्पूचे काही थेंब टाकून काही मिनिटे पाय यामध्ये बुडवून ठेवल्यास आराम मिळतो. तसेच नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील दुधाचा वापर करता येतो. दही, मेयोनीज आणि कच्च दूध एकत्र करून हे मिश्रण केसांवर लावून थोडावेळ मसाज करावा. त्यावर शॉवर कॅप घालवी. ३० ते ४० मिनिटांनी केस धुवावे.