Beed Crime | विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा पोलिसांंनी लावला छडा; पत्नीच्याच 3 प्रियकरांनी रचला होता कट

बीड / माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा (Partial Corpses) उलगडा अखेर (Beed Crime) समोर आला आहे. शेलगाव थडी (Shelgaon Thadi) शिवारातील विहिरीमध्ये 11 मे रोजी कमरेच्या वरचा भाग नसलेला मृतदेह सापडला होता. त्याचा उलगडा झाला आहे. बाभळगाव येथून बेपत्ता असलेले निराधार समितीचे माजी सदस्य दिगंबर हरिभाऊ गाडेकर (Digambar Haribhau Gadekar) यांच्या पत्नीच्या 3 प्रियकरांनीच दिगंबर याच्या शरीराचे 2 तुकडे करत, त्यांचा खून (Murder) केला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

9 महिन्यापासून बेपत्ता असलेले निराधार दिगंबर गाडेकर यांचा मृतदेह शेलगाव थडी शिवारातील विहिरीत अर्धवट मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यांच्या खुनाचं गुढ अखेर समोर आलं आहे. गाडेकर यांच्या पत्नीच्या 3 प्रियकरांनी कट रचून त्यांना पळवून नेले. जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या रिधोरीच्या बंधाऱ्यावर त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण पोलिसांकडून (Rural Police) गुरुवारी या तिघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. (Beed Crime)

सप्टेंबर 2021 मध्ये दिंद्रुड पोलिस ठाण्यात (Dindrud Police Station) कुटुंबीयांनी गाडेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, बुधवारी शेलगावथडी शिवारात असलेल्या बापूराव डोके (Bapurao Doke) यांच्या शेतातल्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचा कंबरेवरील भाग नसलेला मृतदेह आढळला. तर आजूबाजूच्या गावात कोणीही हरवल्याची घटना घडली नसल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने तपासास अडथळे निर्माण होऊ लागले. अखेर मृतदेहावर असलेल्या पॅन्टच्या खिशात काही महिलांचे फोटो सापडले आहेत. त्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता, हा मृतदेह दिगंबर गाडेकर यांचा असल्याचं निष्पन्न झाली असल्याची माहिती आहे.

 

Web Title : Beed Crime | half of the body found in the well finally unearthed lovers made pieces of beloved husband beed crime

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त