बीडमध्ये भरदुपारी सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील जयदत्‍त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालेपीर भागात घडली. भरदुपारी खूनाची घटना घडल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून शिक्षकाचा खून झाल्याचे समजताच संबंधितांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी करण्यास सुरवात केली.

सय्यद साजिद अली असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सैनिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सय्यद यांचा कुकरीने भोसकून खून केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांचा खून कोणत्या कारणामुळे केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सय्यद यांचा खून झाल्याचे समजताच सय्यद यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली.

भरदुपारी खून झाल्याचे समजताच बीड पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सय्यद यांच्या छातीवर व पोटावर वार करण्यात आले आहेत. रक्‍ताच्या थारोळयात पडलेल्या सयय्द यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलिस करीत आहेत.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like