पुण्यात 1983 मध्ये देण्यात आली होती ‘एकाचवेळी’ 4 मारेकऱ्यांना फाशी, आता दुसऱ्यांदा ‘निर्भया’ केसमध्ये होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निर्भया केसमधील चारही आरोपींच्या विरोधात न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले आहे. 22 जानेवारी रोजी चारही आरोपीना एकसाथ फाशी देण्यात येणार आहे. मात्र एकसाथ चार जणांना फाशी देण्याची ही देशातील दुसरी वेळ आहे. या आधी 36 वर्षांपूर्वी म्हणजेच 1983 साली पुण्यातील येरवडा जेलमध्ये चार आरोपीना फाशी देण्यात आली होती.

जानेवारी 1976 ते 1977 दरम्यान पुणे शहरात 10 जणांची हत्या झाली होती. तेव्हा हे प्रकरण अच्युत जोशी-अभ्यंकर सीरियल किलिंगच्या नावाने चर्चेत आले होते. दोषींमधील सुभाष चांडक नावाचा एक जण सरकारी साक्षीदार झाला होता. मारेकरी हे पुणे येथील अभिनव आर्ट कॉलेजमधील व्यावसायिक कला शाखेचे विद्यार्थी होते. परंतु दारूची लथ आणि गाड्यांचा शौक पूर्ण करण्यासाठी त्यांनी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले होते.

पहिली हत्या,16 जानेवारी 1976
मारेकऱ्यांनी आपला क्लासमेट प्रसाद हेगडेचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून खंडणीची मागणी केली होती. त्याला फसवून एका पत्र्याच्या घरात घेऊन गेले आणि त्याच्याकडून जबरदस्तीने चिट्ठी लिहून घेतली की, त्याने आपल्या मर्जीनं घर सोडले आहे. त्यानंतर त्यानी प्रसादला ठार मारले आणि मृतदेह एका लोखंडी बॉक्समध्ये टाकून तलावात फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी प्रसादाची चिट्ठी त्याच्या वडिलांना दिली.

यानंतर सहा महिन्यात केल्या 9 हत्या
मारेक्यांनी 31 ऑक्टोबर 1976 ते 23 मार्च 1977 पर्यंत आणखी 9 लोकांना ठार केले. यावेळी त्यांनी लूटमार करण्यासाठी अनेक घरात प्रवेश केला. येथे कुटूंबाला बंदी बनवून ठेवण्यात आले आणि रस्सीने गळा आवळून मौल्यवान वस्तूची लूट केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

दहशतीमुळे सायंकाळी 6 नंतर लोक घराबाहेर पडणे टाळत होते
सीरिअल किलिंगची तपासणी करणारे एसीपी शरद अवस्थी सांगतात, ज्यावेळी यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर खूप गर्दी होती. तर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब रुणवाल सांगतात की,सीरिअल किलिंगमुळे शहरात दहशतीचे वातावरण होते. लोक सायंकाळी सहा नंतर बाहेर पडणे टाळत होते. तसेच याबाबतच्या बातम्या देखील वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचल्या जात होत्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/