काकडीच नव्हे तर तिच्या बियांचेही होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – ऋतु कोणताही असू द्या बाजारात काकडी सहज उपलब्ध होते. काकडी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काकडीमुळं शरीराला पाणी आणि थंडावा मिळतो. याच्या बियांचाही आपल्याला खूप फायदा होतो. काकडीच्या बिया वाळवून त्याचा मगज म्हणून वापर केला जातो. आज आपण काकडीच्या बियांचे काय फायदे होतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

काकडीच्या बियांचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

2) मासिक पाळीत सतत पोट दुखणं, जास्तीचा होणारा रक्तस्त्राव याच्या सेवनामुळं कमी होतो.

3) लघवी कमी होणं किंवा त्यात अडथळा निर्माण होणं यावरही या बियांचा खूप फायदा होतो.

4) त्वचेचा रंग सुधारतो.

5) आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी होतं.

6) घशात सारखी कोरड पडत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात. आराम मिळेल.

7) ताप येत असेल तर काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्यासोबत घ्याव्यात.

8) वजन वाढतं.

9) पित्त कमी होतं.

10) त्वचेवरील डाग, मुरूम कमी होतात.

11) उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.