चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, काळेपणा घालवून त्वचा तरूण दिसण्यासाठी ‘असा’ करा बटाट्याचा वापर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पिंपल्स, सुरकुत्या, मानेवरील काळेपणा, चेहऱ्यावरील डाग यासाठी आज आपण घुरगुती उपाय जाणून घेणार आहोत. खास बात अशी की, यानं चेहऱ्याचा ग्लोदेखील वाढतो. यासाठी बटाट्याचा कसा वापर करायंच हे जाणून घेऊयात.

फेस पॅक –

‘असा’ तयार करा बटाट्याचा पॅक

– बटाट्याची साल न काढता पेस्ट तयार करा.

– यात 3-4 चमचे मुलतानी माती टाका.

– आता यात गुलाब जल टाकून मिश्रण तयार करा.

– आता ही तयार झालेली पेस्ट म्हणजेच तुमचा फेस पॅक आहे.

ही पेस्ट आता चेहरा आणि मानेवर लावा. 30 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. याचा जर काही दिवस नियमित वापर केला तर तुमची स्किन ग्लो करू लागेल. विविध समस्यांसाठी तुम्ही बटाट्याचा वापर करून सौंदर्य वाढवू शकता. समस्येनुसार बटाट्याचा कसा वापर करावा याची माहिती घेऊयात.

1) अ‍ॅक्ने, काळे डाग – बटाट्याची साल वाटून घ्या आणि त्वचेवर मसाज करा. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. यानं चेहरा साफ होतो. अर्ध्या बटाट्याच्या रसात एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. हे मिश्रण आता चेहरा आणि मानेवर लावा. अर्ध्या तासानं चेहरा कोमट पाण्यानं धुवा. यामुळं अॅक्ने आणि काळे डाग जातील.

2) त्वचा तरूण दिसण्यासाठी – अर्ध्या बटाट्यात दोन चमचे दूध मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. अर्ध्या तासानं चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. याशिवाय तुम्ही बटाट्याचा रसही त्वचेला लावू शकता. यामुळं पिगमेंटेशन कमी होतं. त्वेचतील घाण निघून जाते. 10-15 दिवस बटाट्याचा रस वापरल्यानं आराम मिळेल.

3) काळेपणा घालवण्यासाठी – साल काढलेले बटाटे तुकड्यांमध्ये कापून घ्या. या तुकड्यांनी चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिट मसाज करा. यामुलळं स्किन टोन लाईट होतो. याचा रस वापरला तर टॅनिंग कमी होते.

4) डोळ्यांखालील काळे डाग – ताज्या बटाट्याचा रस घ्या. कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज कमी होते आणि काली वर्तुळंही नाहीशी होतात.