Bengal : Love Jihad वर बोलल्या खा. नुसरत जहाँ ! म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आधीच राजकीय आंदोलनं सुरू झाली आहेत. तृणमूल काँग्रेसकडून आताच आक्रमक प्रचार सुरू झाला आहे आणि भाजपला काउंटर केलं जात आहे. टीएमसी खासदार आणि बंगाली अ‍ॅक्ट्रेस नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांनी सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद (Love Jihad) च्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

नुसरत जहाँ म्हणाल्या, प्रेम ही खासगी बाब आहे. त्यामुळं त्याच्यासोबत जिहाद नाही होऊ शकत. आपण कधी धर्म जातीच्या आधारावर कोणाचं विभाजन नाही करत. लोकांनी अशा मुद्द्यांपासून दूर राहायला पाहिजे. धर्माला कोणाचाही भाग नाही बनवला पाहिजे.

नुसरत जहाँ म्हणाल्या, अशा प्रकारचे मुद्दे उचलून धरत लोकांच्या खासगी चॉईसवर हल्ला होता कामा नये. भारतात कोणीही अशा प्रकारे हुकूम चालवू शकत नाही.

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून विधानं केली जाताना दिसत आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये याबद्दल कायदा केला जात आहे. जिथं भाजपविरोधी पक्षात आहे तिथल्या राज्यांना याबद्दल कायदा करण्याची मागणी करत आहे.

यावेळी नुसरत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. या हिशेबानं अद्याप 12 कोटी नोकऱ्या दिल्या जाणं गरजेचं होतं. आम्हाला तर 12 लाख नोकऱ्याही नाहीत दिसल्या असंही त्या म्हणाल्या.

नुसरत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर नुसरत जहां यांनी बंगाली सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत स्वत:ची जागा तयार केली आहे. अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या नुसरत यांनी शोत्रु या सिनेमातून सिनेजगतात पाऊल टाकलं. 2011 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्प्रप्रेस अशा सिनेमात नुसरत यांनी काम केलं आहे.