विवाहित प्रेयसीनं प्रियकराचे अन् त्याच्या Ex गर्लफ्रेंडचे तसले फोटो केले मॉर्फ, त्यानंतर…

बंगळुरू : वृत्तसंस्था –   बंगळुरू ( Banglore) पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले असून, यामध्ये प्रियकराच्या एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल ( Blackmail) करून तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला बुधवारी अटक ( Arrest) केली. या प्रकरणातील आरोपी महिला ही विवाहित असून, तिचे नाव अनुश्री असे आहे. ही महिला आपला पती आणि मुलासोबत कालकेरे येथे राहते. अनुश्रीचा प्रियकर महेशही या प्रकरणात आधी संशयित होता. पण त्याचा यामध्ये सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याची यातून सुटका केली.

काय आहे प्रकरण?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणातील महेश या व्यक्तीचे कॉलेज जीवनात एका मुलीशी प्रेम प्रकरण होते. त्यानंतर ते वेगळे झाले. त्या मुलीचा दुसऱ्या मुलाबरोबर विवाहदेखील झाला. ११ वर्षांपूर्वी बंगळुरूमधल्या एका उद्योजकासोबत विवाह झाला. त्याचा एक मुलगाही आहे.त्यानंतर महेश आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण जुलै २०१९ मध्ये महेशने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोबाइल नंबर मिळवला व तिला मेसेज पाठवला. दोघांचे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर अनुश्रीने महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला. मी आता महेशची गर्लफ्रेंड आहे असे सांगून तिने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर अनुश्रीने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला तिचे फोटो पाठवायला सांगितले. त्यानंतर तिने विश्वास ठेवून अनुश्रीला फोटो पाठवलेदेखील. त्यानंतर तिने एक दिवस तिला फोन करत कॉलेजच्या दिवसातले तुमचे प्रणयाचे काही फोटोज आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, असे सांगितले. पुरावा म्हणून मॉर्फ केलेले फोटोसुद्धा तिने महेशच्या गर्लफ्रेंडला पाठवले.

पैशांची मागणी पूर्ण केली नाही, तर ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची अनुश्रीने धमकी दिली. त्यानंतर त्या मुलीने आपला संसार मोडेल या भीतीने तिला पैसे पाठवले. मागच्या दीड वर्षात तिने तब्बल १.३ कोटी रुपये अनुश्रीला पाठवले. दरम्यान, एक्स गर्लफ्रेंडच्या पतीच्या ही बाब लक्षात येताच त्याने तिला याबाबत विचारले. आपल्या पत्नीच्या खात्यातून ठराविक एका अकाउंटवर पैसे ट्रार्न्सफर झाल्याचे त्याला समजले. जेव्हा त्याने याबद्दल पत्नीला जाब विचारला. त्यावेळी तिने आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे सांगितले. पतीच्या सल्ल्यावरून तिने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अनुश्रीला अटक करण्यात आली.