मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं सांगत संजय राऊतांनी दिल्या भाजपाला ‘शुभेच्छा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सायंकाळी भाजपला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं, असं आवाहनही  संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपानं निकालानंतर २४ तासांत जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता. पण भाजपाने सत्ता स्थापन करायला ऐवढा वेळ का लावला माहित नाही. राज्यपालांच्या पुढाकारानेच नवं सरकार मिळू शकेल. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा तरी भाजपने लाभ घ्यावा. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आमच्याकडून शुभेच्छा. मात्र  शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नाही.’

काँग्रेस – राष्ट्रवादीविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या भल्यासाठी प्रत्येकांनी प्रत्यन्त केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत. काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आमचे राजकीय मतभेद आहेत. ते कोणाचे नसतात. आम्ही अनेकदा भाजपाच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही. ‘

राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. भाजपने अजूनही या निमंत्रणाला उत्तर दिलेलं नाही.  निमंत्रण स्वीकारल्यास भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून ठराविक कालावधी दिला जाईल. विधानसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यास भाजपचं नवं सरकार अल्पावधीचंच ठरेल.

Visit : Policenama.com