मराठा स्नेहमेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटलांना विजयासाठी शुभेच्छा !

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन – आशिष गार्डन येथे कोथरूड विधानसभा मतदारसंघांमधील सर्व मराठा तरुण एकत्र येऊन मराठा मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्यामध्ये कोथरूडमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगताना सांगितले की, “मध्यंतरी परिवहन खात्यांमधील नोकर भरती विषयी काही घटनात्मक पेचप्रसंग उभा राहिला त्यावेळी मोठ्या संयमाने तो प्रश्न दोन तास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडवला तसेच मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध असण्याबरोबरच माझे कर्तव्य आहे.”

या मेळाव्यामध्ये “एक मराठा लाख मराठा” च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, देखील घोषणांनी कार्यालय घुमले होते. मराठा मेळाव्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे व छावा संघटनेचे प्रमुख तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक धनंजय जाधव, दिलीप पाटील, प्रविण पाटील, राजाभाऊ पवार, अनिल पाटील, गुलाब गायकवाड इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

प्रविण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे, छावा संघटना, छावा क्रांतीवीर सेना, शिवसंग्राम व इतर संघटनांनी सहभाग घेतला होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी