‘भाईजान’ सलमानसोबत आहे त्याची गर्लफ्रेंड, गायीसोबत करत होती ‘टाईमपास’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे जो 3 मे 2020 पर्यंत असणार आहे. अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. अशात सलमाची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिचा एक व्हिडीओ समोर आला होत ज्यातून ती सलमान सोबत आहे असं वाटत होते. असं लक्षात येत आहे की, दोघं सोबत आहेत. दोघांच्या सोशलवरील पोस्टवरून हिंट मिळाली आहे. युलियाला सलमानच्या फार्म हाऊसवर वेळ घालवण्यासाठी नवीन साथीदार मिळाला आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1253222581374799872

हा नवीन साथीदार दुसरा तिसरा कोणी नसून एक गाय आहे. युलियानं एका गायीचा फोटो शेअर केला आहे. तिनं इंस्टा स्टोरीला फोटो शेअर करत सांगितलं आहे की, तिला नवीन जीम पार्टनर मिळाला आहे. सोबत तिनं जीमचाही फोटो शेअर केला आहे. तिनं असंही लिहिलं की, आता सर्वासाठी कार्डिओ करण्याची वेळ झाली आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1253224044666773504

सलमान खान प्रमाणेच युलिया देखील एक फिटनेस फ्रिक आहे. ती आपल्या एक्सरसाईज आणि फिटनेसवर खूप लक्ष देत असते. अधून मधून ती वर्कआऊट करतानाचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सध्या ती फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. तिथेच ती वर्कआऊट आणि घोडस्वारी करत आहे. तिनं याचा एक व्हिडीओ देखील सोशलवर शेअर केला होता.