भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचे शुक्रवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. त्यांनी लिहिलेले ‘गाणाऱ्याचे पोर’ हे पुस्तक विशेष गाजले होते.राघवेंद्र जोशी हे गेले काही दिवस आजारी होते. त्यातच पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत विझली.
स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे राघवेंद्र जोशी हे ज्येष्ठ चिरंजीव.

त्यांनी आपल्या दिग्गज वडिलांच्या स्वत:च्या लहानपणीच्या आठवणी ‘गाणार्‍याचे पोर’ या पुस्तकातून रसिकांच्या समोर आणल्या आहेत. भीमसेन जोशी कर्नाटकातील बदामी या ठिकाणी राहत असताना आपल्या आईवडिलांच्या संसारातील सुखाच्या आठवणी या पुस्तकात त्यांनी सांगितल्या आहेत.

भीमसेन जोशी यांच्या सुरुवातीच्या खडतर जीवनातील त्यांच्या पत्नीचे किती मोठे योगदान होते, हे त्यांनी जगासमोर या पुस्तकातून आणले होते. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर राघवेंद्र जोशी यांनी त्यांच्या संपत्तीतील हिस्साबाबत न्यायालयीन लढाही दिला होता. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नव्हते.

You might also like