धक्कादायक ! मर्चंट नेव्हीमधील 27 वर्षीय तरूणानं केली आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – मर्चंट नेव्हीमध्ये काम करणार्‍या तरुणाने भिवंडीतील कशेळी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. नारपोली पोलिसांनी ठाणे अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.

राहुल संदीप जोशी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कोरोनामुळे मर्चंट नेव्हीत काम बंद असल्यामुळे राहुल घरी होता. मागील एक महिन्यांपासून त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरु असल्याची माहिती राहुलची बहीण नेशा जोशी यांनी दिली आहे. राहुलचे वडील हे कामासाठी ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना खाडीपुलावर गर्दी दिसली.त्या ठिकाणी मुलाची बाईक आढळून आली. नागरीकांनी माहिती दिल्यावर त्यांना ही घटना समजली. नागरिकांसह ठाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी खाडी पत्रात राहुलचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही.