Bhosari News : VIP SPA सेंटरमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

भोसरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिक फाट्याजवळ असलेल्या सागर कॉर्नर बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरली VIP SPA & BEAUTY या स्पा सेंटरमध्ये करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका केली असून स्पा सेंटरच्या महिला मॅनेजर विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

स्पा सेंटरची मॅनेजर सिमा चरणदार शिंदे (वय-35 रा. सेक्टर नं. 666/ए, 2/10, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी रोड, मार्केट यार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.19) रात्री पावणे सातच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक मारुती डोंगरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाट्याजवळ असलेल्या बिल्डींगमधील VIP SPA & BEAUTY मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. पोलिसांनी 12 हजार 720 रुपयांची रोख रक्कम, 19 हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, 35 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 31 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस हवालदार संदिप गवारी, अनंत यादव, सुनिल शिरसाठ नितीन लोंढे, पोलीस नाईक मारुती करचुंडे, भगवंता मुठे, महेश बारकुले, दिपक साबळे, विष्णु भारती, अमोल शिंदे, अनिल महाजन, नामदेव राठोड, गणेश कारोटे, पोलीस शिपाई राजेश कोकाटे, योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.