मोदी सरकारकडून देशभरात 1 लाखापेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ‘मेगा’भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लवकरच मेगाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून लवकर मेगाभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. देशात वर्षभरात केंद्र सरकारच्या विविध विभागात 1 लाखहून आधिक रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 1 मार्च 2018 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागात 7 लाख रिक्त जागा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.

यावेळी जितेंद्र सिंह यांनी माहिती देताना सांगितले की तृतीय श्रेणीत 5,74,289 पदे रिक्त आहेत. द्वितीय श्रेणीत 89,638 पदे तर प्रथम श्रेणीत 19,896 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची एकूण संख्या 6,88,823 इतकी आहे. तसेच, 2019-20 मध्ये कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) 1,05,338 केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या तयारीत आहेत.

रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून 2017-18 सेंट्रलाइज्ड एम्पलॉयमेंट नोटिफिकेशन द्वारे 1 लाख 27 हजार 573 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. याशिवाय तृतीय श्रेणी आणि लेव्हल 1 पोस्टसाठी 2018-19 साली CENs जारी करण्यात आले होते. त्याद्वारे 1 लाख 56 हजार 138 जागा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 4 लाख 08 हजार 591 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे देखील जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

1 जानेवारी 2016 पासून अनेक पदांसाठी मुलाखत बंद करण्यात आली आहे. अनेक टेस्ट ऑनलाइन घेण्यात येत आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षित वर्गांसाठी बॅकलॉग जागांची संख्या मोठी आहे असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

Visit : Policenama.com