पाकिस्तनमधील कराचीमध्ये मोठा स्फोट 3 ठार तर 15 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील कराची ( Karachi) मध्ये मोठा स्फोट झाला आहे. गुलशन-ए-इकबाल ( Gulshan-e-Iqbal) मध्ये मसकन चौरंगी येथील दुमजली इमारतीत हा स्फोट ( Blast) झाला आहे. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.

हा स्फोट एवढा भयंकर होता कि आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. पाकिस्तानी मीडिया डॉनने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात ( Patel Hospital) नेण्यात आलं आहे.

अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. मुलिना टाऊन पोलिसांच्या एसएचओ ने सांगितले की प्रथमदर्शनी हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे समजत आहे. या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बॉम्बस्फोटाचे पथक रवाना झाले आहे.