चीनला सौदी अरेबियाचा मोठा झटका, 10 अरब डॉलरच्या कराराला लावला ब्रेक

रियाद : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाने चीनला मोठा झटका दिला दिला आहे. येथील सार्वजनिक तेल कंपनी सौदी अरामकोनो चीन सोबतचा 10 अरब डॉलरचा करार सध्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनात ही रक्कम साधारण 75 हजार कोटी रुपये होते. या करारानुसार अरामको कंपनी चीनमध्ये एक रिपायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स बनवणार होती. जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे तेलाच्या किंमती सातत्याने कमी होत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेलाच्या किंमती कमी झाल्याने तेल कंपन्यांना खूप नुकसान होत आहे आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन अरामको कंपनीने चीनसोबतचा हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेल स्वस्त होण्याची शक्यता
सौदी अरेबिया आणि चीनमधील हा करार रद्द झाल्याने तेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अमराको कंपनीने किंवा त्यांचे चिनी भागीदार असलेल्या चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्फोरेशन आणि पंजिन सिनसेनकडून कोणतीही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. चीन आणि सौदी अरेबियामध्या हा करार फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता, ज्यावर खुद्द सौदीचे राजकुमार सलमान यांची सही आहे.

चीनला मोठा फटका
असं म्हटलं जातय की, या कराराद्वारे अरामको कंपनीला आशियाच्या बाजारात आपली पकड मजबूत करायची होती. तसेच या करारानंतर सैदी अरेबिया चीनमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या बाजारातील तेलाच्या किंमती कमी झाल्याने आणि बाजारातील अनिश्चितता पाहता हा करार मागे टाकण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे संक्रमणामुळे जगभरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत आणि तेलाची मागणीही बरीच कमी झाली आहे. यामुळे चीनचे व्यापक प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.