ड्रग्ज प्रकरण : NCB ने सर्व्हिलन्सवर ठेवले 3 कलाकारांचे फोन, लवकरच होणार चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासणीबाबत एनसीबीची व्याप्ती सतत वाढत आहे. आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्या विरोधात एनसीबीने कडक कारवाई केली आहे. या सर्वांना समन्स पाठवून एनसीबीने त्यांची चौकशी केली आहे. अभिनेत्रींनंतर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध ए लिस्ट अभिनेत्यांची एनसीबी चौकशी करू शकते.

एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडचे मोठे कलाकार

एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, बॉलिवूड अभिनेत्रीनंतर एनसीबीच्या रडारवर ए यादीतील मोठे आणि प्रसिद्ध कलाकार आहेत. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड महिला कलाकारांना घेरल्यानंतर आता पुरुष कलाकारांचा क्रमांक लवकरच येऊ शकतो. एनसीबीला याबाबत इनपुट आणि पुरावे मिळताच पुरुष कलाकारांवर कारवाई केली जाईल.

बॉलिवूडचे ३ कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांचे फोन सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आले आहेत आणि मॉनिटर केले जात आहेत. लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. हे प्रकरण इतर शहरे आणि राज्यांसह देखील जोडले आहे. तेथील झोनल युनिट वर्कआउट करत आहे. एनसीबीने या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदाबाद, इंदूर, चेन्नई आणि बेंगळुरु येथून अतिरिक्त टीम बोलवल्या आहेत.

दीपिका पदुकोणचा फोन उघडणार रहस्य !

एनसीबी सध्या इनपुटवर काम करत आहे. तसेच एनसीबी दीपिका पादुकोणच्या मोबाइलवरून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करेल. दीपिकाच्या फोनवरून एनसीबीला अनेकांची नावे समोर येण्याची अपेक्षा आहे. एनसीबीने चौकशीनंतर सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे फोन जप्त केले होते.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा प्रयत्न आहे की, पॅडलर्सच्या माध्यमातून बॉलिवूडच्या मोठ्या नावांवर कारवाई केली जाऊ शकते. सर्व पुरावे गोळा केल्यानंतरच मोठ्या कलाकारांवर कारवाई केली जावी. त्यांना चौकशीसाठी बोलावले जावे. आता पहावे लागेल की, येत्या काळात एनसीबी कोणत्या मोठ्या कलाकारांच्या नावाचा खुलासा ड्रग्स प्रकरणात करते.