मोदी सरकारचा नोकरदारांना मोठा दिलासा ! अनेक नियमांत होणार बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –   नोकरदारांना मोठा दिलासा देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने, 19 नोव्हेंबर 2020 रोजी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य स्थिती, 2020 अंतर्गत अनेक नियम केले आहेत. ज्याचा थेट फायदा नोकरदार, मजूर आणि स्थलांतरित कामगारांना होणार आहे. सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती चांगली आणि सोपी करावी, हा या नियमांचा उद्देश आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. हे सर्व नियम अधिसूचनेच्या तारखेपासून 45 दिवसांमध्ये सादर करावे लागणार आहेत.
डॉक वर्कर्स, बिल्डिंग आणि कंस्ट्रक्शन वर्कर्स, माईन वर्कर्स, आंतरराज्य स्थलांतरित कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेबर, वर्किंग जर्नालिस्ट, ऑडिओ-व्हिज्युअल वर्कर्स आणि सेल्स प्रमोशन कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थितीसंदर्भात व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती पाहता, 2020 मध्ये तरतुदींनुसार नियम बनवले जाणार आहेत. जाणून घ्या या नवीन नियमांबद्दल

नियुक्तीपत्र (अपॉइंटमेंट लेटर)

नवे नियम लागू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्याला नियुक्त पत्र अर्थात अपॉइंटमेंट लेटर देणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवीन नियमांनुसार, कोणत्याही कंपनीत, अस्थापनेत, कर्मचाऱ्याला अपॉइंटमेंट लेटर मिळेपर्यंत त्याची नेमणूक केली जाणार नाही.

मोफत आरोग्य चाचणी (फ्री टेस्ट) – कारखाना, खोदकाम, बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांची कंपनीकडून मोफत आरोग्य चाचणी केली जाणार आहे. परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांच्यासाठीच ही चाचणी केली जाणार आहे.

ओव्हरटाइम – ओव्हरटाइमच्या कॅलक्युलेशनमध्ये 15 ते 30 मिनिटांमध्ये एका तासाचा अंश 30 मिनिटांच्या रूपात मोजला जाणार आहे. सध्या 30 मिनिटांहून कमी वेळेला ओव्हरटाइम ग्राह्य धरले जात नाही.

महिला कर्मचाऱ्यांसाठी – सकाळी 6 वाजण्याआधी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगीनुसारच, कामासाठी बोलवले जाईल. प्रवास करणाऱ्या आंतरराज्यातील मायग्रेट वर्कर्ससाठी, वर्षातून एकदा प्रवास भत्तासंबंधी नियम आणि तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाची तरतूदही केली आहे. त्याशिवाय कंपनीसाठी इलेक्ट्रॉनिक नोंदणी, लायसन्स आणि अ‍ॅन्युअल इंटिग्रेटेड रिटर्न असणे आवश्यक आहे.