दिलासादायक ! नाही जाणार कोणाचीही नोकरी, भरती देखील नाही होणार कमी : भारतीय रेल्वे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रेल्वेचे डीजी (एचआर) आनंद एस खाटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वेमध्ये कोणाचीही नोकरी जात नाहीये किंवा भरती कमी केली जात नाहीये. ट्रेनच्या कामकाजासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुरक्षा श्रेणीतील नोकर्‍या सरेंडर केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. गैर-सुरक्षिततेच्या रिक्त जागांना सरेंडर केल्यास रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या नवीन प्रकल्पांसाठी अधिक सुरक्षा असणारी व्हेकेन्सी काढण्यात मदत होईल. रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नवीन क्षेत्रे तयार होत आहेत. अशा परिस्थितीत संसाधनांचा योग्य वापर करणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच विविध श्रेणीच्या पदांसाठी सुरू असलेली भरती मोहिम नेहमीप्रमाणे सुरू राहील. रेल्वेमध्ये नोकरी कपात होणार नाही.

भरती प्रक्रिया सुरु राहील

रेल्वेचा ६५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शनवर होतो. त्यांनी सांगितले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या १,४६,६४० जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होती, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण ६८ हजार नॉन सेफ्टी प्रवर्गात भरती बाकी असून त्याचा आढावा घेतला जात आहे. मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रेल्वेकडून नियमित गाड्याही १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवल्या जातील. अशा परिस्थितीत होणारे मोठे नुकसान कमी करण्यासाठी रेल्वेने आपला खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत नवीन भरतीवर बंदी आणि जुन्या भरतींचा आढावा घेतला जात आहे.

शुक्रवारी अनेक माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये असे वृत्त आले होते की, भारतीय रेल्वेने सुरक्षितता वगळता सर्व नवीन पदांसाठी अर्ज रद्द केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेमध्ये कोणतीही नवीन भरती होणार नाही. तर मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षात रिक्त पदांच्या भरतीचा आढावा घेतला जाईल. सुरक्षा श्रेणी वगळता ५० टक्के पदांसाठी व्हेकेन्सी काढली जाणार नाहीत.