कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला ‘चपराक’, ‘या’ नियमाचे उल्लंघन केल्याचा ‘ठपका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुलभूषण जाधव प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाकिस्तानला मोठा झटका बसला असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलकवी अहमद युसूफ यांनी पाकिस्तानने नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने जाधव यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काय म्हणाले अब्दुलकावी यूसुफ –

पाकिस्तानी सैन्याने कुलभूषण जाधव यांना दहशतवाद आणि जासूसीच्या आरोपाखाली 2017 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल लागल्यानंतर जाधव यांना कौन्सिलर देण्याचे पाकिस्तानला आदेश दिले होते. त्याचबरोबर हा खटला पुन्हा नव्याने सुरु करण्याचे आदेश दिले होते. तसेच हे एक संवेदनशील प्रकरण असल्याचे देखील सरन्यायाधिशांनी म्हटले आहे. त्याचबरोबर एखाद्या निष्पक्ष माणसाला वाचवण्याचे पुण्य माझ्या हातून घडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

Visit : Policenama.com