‘मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही’, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष सोडून जावे अशी कोणाची अपेक्षा आहे ? पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याची बातमी कोणी दिली याचा शोध घेणार असून भाजप पक्ष माझ्या वडिलांनी उभारला आहे. प्रत्येकजण म्हणत असतात हे माझ्या बापाचे, ते माझ्या बापाचे पण मी म्हणते हा पक्ष माझ्या बाबाचा पक्ष आहे. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्ष कुणाच्याही मालकीचा नसल्याचे सांगितले.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला कोअर कमिटीतून मुक्त करा. अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केली. तसेच आता मी कोअर कमिटीची सदस्य नाही असा मोठा खुलासा करताना त्यांनी बेईमानी आमच्या रक्तात नसल्याचे सांगून आता पक्षाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुंबईत गोपीनाथ मुंडे सुविधा कार्यालय सुरु करणार असल्याचे सांगून आपण राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले.

राज्याचा दौरा करुन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत मी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्ष सोडणार नसल्याचे सांगताना त्यांनी पक्षाने काय तो निर्णय घ्यायचा असल्याचे सांगितले. आता मी आमदार नाही, मंत्री नाही तसेच साधी नगरसेविका देखील नसल्याचे सांगत मला पदाची लालसा नसल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/